पुणे : यंदा देशात कापसाची लागवड वाढली आहे. राज्यातील कापूस दिवाळीनंतर बाजारात येतो. मात्र पंजाब, हरियाणातील कापूस बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. या कापसाचे दर सुरुवातीपासूनच नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटलवर आहेत. कापसाच्या दरात जागतिक पातळीवर तेजी असल्यामुळे देशांतर्गत बाजारातही संपूर्ण हंगाम तेजीत राहील, असे अशी माहिती जाणकार व्यक्त करीत आहेत.

पंजाब, हरियाणात राज्यात उत्पादित होणारा नवा कापूस बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. या कापसाला सरासरी नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर तेजीत असल्यामुळे यंदा देशांतर्गत बाजाराची सुरुवात ही तेजीने झाली आहे. अशीच तेजी पूर्ण हंगाम भर राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पंजाब आणि हरियाणामधील जो कापूस बाजारात येत आहे. त्या कापसामध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असल्यामुळे प्रथम व्यापारी खरेदी टाळत होते. मात्र बाजारात कापसाची टंचाईच असल्यामुळे व्यापाऱ्यांना हा कापूस खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातही सुताला मागणी वाढली आहे.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Woman wash hair with toxic foam in Yamuna river video viral
“अहो ताई, तो शॅम्पू नाही” यमुना नदीत महिलांचा किळसवाणा प्रकार; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात

देशात यंदा चारशे लाख गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, जुलै, ऑगस्ट मधील पावसाने विशेष करून विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, गुजरात आणि मध्य प्रदेशातील कापसाच्या पट्टय़ात मोठे नुकसान झाले आहे. पीक वाहून गेले आहे. त्यामुळे अंदाजापेक्षा उत्पादन कमी होण्याची शक्यता गृहीत धरून व्यापारी मोठय़ा प्रमाणात कापसाचा साठा करून ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण कायम राहील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेत दुष्काळामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर देशांतर्गत बाजारात कापसाची मागणी वाढली आहे. बांगलादेशकडूनही मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे कापसाचा येणारा संपूर्ण हंगाम तेजीतच राहील, अशी शक्यता आहे.

चंद्रकांत जाधव, कापूस उद्योगाचे अभ्यासक, जळगाव