पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ५८व्या पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ‘पिक्सल्स्‌‍’ एकांकिकेने बाजी मारत प्रतिष्ठेचा ‘पुरुषोत्तम करंडक’ पटकावला. सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचा जयराम हर्डीकर करंडक गणेशखिंडच्या मॉडर्न महाविद्यालयाने ‘फेलसेफ’ एकांकिकेसाठी मिळवले. मात्र स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अभिनय, वाचिक अभिनयासाठीची पारितोषिके कोणालाही देण्यात आली नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार आणि रविवारी भरत नाट्य मंदिरात झाली. प्राथमिक फेरीत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या नऊ संघाचे अंतिम फेरीच्या तीन सत्रात सादरीकरण झाले. त्यानंतर स्पर्धेचा निकाल निकाल जाहीर करण्यात आला. रंगकर्मी दीपक रेगे, चंद्रशेखर कुलकर्णी, सुषमा सावरकर-जोग यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेतील सांघिक द्वितीय क्रमांकाचा हरी विनायक करंडक स. प. महाविद्यालयाच्या कृष्णपक्ष एकांकिकेला, तृतीय क्रमांकाचा संजीव करंडक मराठवाडा मित्र मंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाला रवायत-ए-विरासत या एकांकिकेसाठी मिळवला. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीला (व्हीआयआयटी) सर्वोत्कृष्ट आयोजित संघाचा भगीरथ करंडक जाहीर करण्यात आला.

विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या इमरान तांबोळी, टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या वैष्णवी चामले यांना अभिनय नैपुण्यासाठी, टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या अक्षय जाजू व सौरभ विजय  यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंडच्या शिरीष कुलकर्णीला प्रायोगिक लेखनासाठी, झील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समृद्धी भोसले आणि यशदा टेंबे यांना विद्यार्थी लेखनासाठी पारितोषिक जाहीर झाले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी, एशिया पॅसिफिक ऑफ इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटचे (आयटीआय-युनेस्को) उपाध्यक्ष विद्यानिधी वनारसे यांच्या हस्ते गुरुवारी (१४ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.