पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘सरहद’ या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांकासह या वर्षीच्या पुरुषोत्तम करंडकावर नाव कोरले आहे. गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘ जार ऑफ एल्पिस’ या एकांकिकेने द्वितीय क्रमांकासह हरी विनायक करंडक आणि सवरेत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी देण्यात येणारा जयराम हर्डीकर करंडक पटकावला आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) ‘पेन किलर’ एकांकिकेला तृतीय क्रमांकासह संजीव करंडक मिळाला आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (५ सप्टेंबर) आणि रविवारी (६ सप्टेंबर) रंगली. रविवारी रात्री अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला. पुरुषोत्तम करंडकाबरोबरच सवरेत्कृष्ट आयोजित संघासाठी देण्यात येणारा भगिरथ करंडक, दिग्दर्शन, सवरेत्कृष्ट अभिनेत्री या पारितोषिकांसह पीआयसीटीईने बाजी मारली आहे. अभिनयासाठी देण्यात येणाऱ्या पारितोषिकांवर गरवारे महाविद्यालयाने आपले वर्चस्व राखले आहे.
या फेरीसाठी प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, लोकेश गुप्ते आणि नाटय़समीक्षक डॉ. अजय जोशी यांनी परीक्षण केले. या वर्षी प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या ५१ संघातून सीओईपी, व्हीआयआयटी, पीआयसीटी, व्हीआयटी, सिंहगड, बीएमसीसी, फग्र्युसन, गरवारे वाणिज्य आणि इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयांची अंतिम फेरीत निवड झाली होती. स्पर्धेचा बक्षीस समारंभ बुधवारी (९ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज यांच्या हस्ते होणार आहे.
अंतिम फेरीतील विजेते
सवरेत्कृष्ट अभिनय नैपुण्य, वाचिक अभिनय – श्रुती अत्रे (गरवारे वाणिज्य महाविद्यालय)
सवरेत्कृष्ट अभिनेता – साकिब शेख (सीओईपी)
सवरेत्कृष्ट अभिनेत्री – निकीता ठुबे (पीआयसीटी)
सवरेत्कृष्ट दिग्दर्शक – मयूर औटी (पीआयसीटी)
सवरेत्कृष्ट विद्यार्थी लेखक – अमृता ओंबळे (इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स)
सवरेत्कृष्ट प्रायोगिक लेखक – आदित्य भगत (गरवारे वाणिज्य महाविद्यालय)
उत्तेजनार्थ पारितोषिके
दिग्दर्शन – नितीश पाटणकर (गरवारे वाणिज्य महाविद्यालय), हर्षवर्धन बिलगये (सीओईपी)
विद्यार्थिनी लेखिका – शालवी पाळंदे (व्हीआयआयटी)
अभिनय – अथर्व गाडगीळ (व्हीआयटी), रामेश्वर बोरुडे (विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी), प्रणव म्हैसाळकर (फग्र्युसन), परितोष भिडे (पीआयसीटी), सेजल जगताप (पीआयसीटी), अमृता ओंबळे (इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स), चिन्मय देव (बीएमसीसी), प्रतीक्षा कोते (सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय), हितेश पोरजे (सिंहगड अभियांत्रिकी), शालवी पाळंदे (व्हीआयआयटी)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा