महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, स. प. महाविद्यालय, टिळक आयुर्वेद महाविद्यालयासह नऊ संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला असून, ९ आणि १० सप्टेंबरला अंतिम फेरी रंगणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> विश्वसुंदरी कॅरोलिना आणि भारत सुंदरी सिनी शेट्टी यांची ससून रुग्णालयाला भेट, रुग्णांची आस्थेने केली विचारपूस

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची प्राथमिक फेरी १६ ते ३० ऑगस्ट या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे झाली. प्राथमिक फेरीत एकूण ५१ संघांनी सादरीकरण केले. त्यात सर्वोत्कृष्ट नऊ संघांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली. गिरीश केमकर, मिलिंद कुलकर्णी, शेखर नाईक यांनी प्राथमिक फेरीचे परीक्षण केले. अप्पासाहेब जेधे महाविद्यालय (पाईक), झील अभियांत्रिकी महाविद्यालय (परत फिरा रे), आयएमसीसी महाविद्यायल, (मायबाब..!?), मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय (रवायत ए विरासत), मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड (फेल सेफ), स. प. महाविद्यालय (कृष्णपक्ष), विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, बारामती (पाऊस पाड्या), राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय (पंक्चर पोहे), टिळक आयुर्वेद महाविद्यालय (पिक्सल्स) यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.

हेही वाचा >>> “शरद पवारांनी दोनदा पंतप्रधान होण्याची संधी घालवली, आता त्यांनी रिटायर्ड…”, सायरस पूनावालांचा सल्ला

अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या संघांसह प्राथमिक फेरीतील वैयक्तिक पारितोषिकेही जाहीर करण्यात आली. फर्ग्युसन महाविद्यालयाची सानिका आपटे, आयएलएस विधी महाविद्यालयातील पूर्वा हारुगडे, शिवाजीनगरच्या मॉडर्न महाविद्यालयातील शंतनू गायकवाड, मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सची गार्गी माईणकर, बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील तृप्ती जाधव, नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयातील मैत्रेयी बडगे, अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयातील अंतरा वाडेकर, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील समृद्धी शेट्टी, पीव्हीपीआयटीतील विवेक पगारे, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील स्वरा कळस यांना अभिनयासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. एमएमसीसीच्या श्रेयस जोशी, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्या देवरे यांना दिग्दर्शनासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purushottam karandak preliminary round results announced nine teams enter in final round pune print news ccp14 zws