भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या ‘उळागड्डी’ या एकांकिकेने सवरेत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेबद्दलच्या जयराम हर्डीकर करंडकासह पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. स.प महाविद्यालयाच्या ‘बेल’ या एकांकिकेने हरी विनायक करंडकासह सांघिक द्वितीय तर, एमआयटी महाविद्यालयाची ‘क ला काना का’ या एकांकिकेने संजीव करंडकासह तृतीय क्रमांक पटकावला.
महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी रात्री संपली. यावर्षी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स महाविद्यालयाने वैयक्तिक पारितोषिकांवरही आपली मोहोर उठवली आहे. या फेरीसाठी प्रसिद्ध अभिनेता किशोर कदम, दिग्दर्शक राकेश सारंग आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी परीक्षणाचे काम पाहिले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (७ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता, नाटय़संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी १२ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या कालावधीत झाली. या स्पर्धेत ५१ संघांनी आपल्या एकांकिका सादर केल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा