‘‘राईट टू एज्युकेशन कायदा आला; पण ‘राईट एज्युकेशन’ चे काय? गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजेच भविष्य हे शिक्षणाशी संबंधित सर्व घटकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे,’’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिन सोहळ्यामध्ये रविवारी व्यक्त केले.
पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणारा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ या वर्षी ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार, खासदार यशवंतराव गडाख, ज्येष्ठ प्रकाशक विलास वाघ, ज्येष्ठ संशोधक डॉ. जयंत नारळीकर, प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, निर्मल ग्राम निर्माण केंद्राच्या संचालिका नलिनी नारवेकर यांना देण्यात आला. या वेळी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. दिलीप ढवळे, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्वतसभेचे सदस्य, संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या संघाचा यावेळी सत्कार करण्यात आला. वर्षभर चांगली कामगिरी करणारी महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. यावेळी डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘सर्व क्षेत्रामध्ये सध्या सर्जनशीलता असणे आवश्यक आहे. येत्या काळात शेतीप्रधान अर्थव्यवस्थेकडून आपला प्रवास हा कल्पकतेवर आधारित अर्थव्यवस्थेकडे होत आहे.’’ यावेळी डॉ. गाडे म्हणाले, ‘‘समाजाच्या पुणे विद्यापीठाकडून खूप अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याची क्षमता विद्यापीठामध्ये आहे. मात्र, त्यासाठी कष्टाची आणि मानसिकतेमध्ये बदल करण्याची गरज आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा