पुणे : विद्यार्थी संघटनेच्या नियुक्तीवरून काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अमिर शेख (वय ३५), भूषण रानभरे (वय ३०), युवराज नायडू (वय ३५), राज जाधव (वय २८) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत प्रफुल्ल संभाजी पिसाळ (वय २६, रा. हिल व्ह्यू सोसायटी, पौड रस्ता) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी (३ फेब्रुवारी) प्रफुल्ल कांग्रेस भवनच्या आवारात थांबले होते. विद्यार्थी संघटनेच्या नियुक्तीवरून आरोपी अमिर, भूषण, युवराज, राज यांच्याशी वाद झाला. त्यानंतर प्रफुल्ल यांना चौघांनी काँग्रेसच्या भवनच्या आवारात बेदम मारहाण केली. त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रफुल्ल यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा – गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत अमूलाग्र बदल! धातूऐवजी सिरॅमिक सांध्याचा वापर ठरेल फायद्याचा

हेही वाचा – पिंपरी : दोन टोळक्यांचा कोयते, दांडके मिरवत धुडगूस; रिक्षा, दुचाकींची तोडफोड

पक्ष संघटनेतील वाद मिटवण्याचा प्रयत्न वरिष्ठांनी केला. प्रफुल्ल यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पानकर तपास करत आहेत.

Story img Loader