पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रश्नपेढीचा वापर करून विद्यार्थी परीक्षेचा सराव करू शकतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्यावर्षी करोना प्रादुर्भावामुळे २५ टक्के अभ्यासक्रमात कपात करण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेचा अंदाज येण्यासाठी एससीईआरटीने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी उपलब्ध करून दिली होती. यंदा परिस्थिती पूर्वपदावर आल्याने शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीपर्यंत एससीईआरटीच्या संकेतस्थळावर गेल्यावर्षीचीच प्रश्नपेढी दिसत होती. त्यामुळे यंदा प्रश्नपेढी मिळणार की नाही, असा प्रश्न विद्यार्थी-पालकांसमोर निर्माण झाला होता.

हेही वाचा – पुणे : दहशत माजविणाऱ्या गुंडावर ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई, कारागृहात स्थानबद्ध करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

हेही वाचा – उमेदवार राहिला बाजूला, स्वतःच्याच पक्षाचा केला प्रचार, पोटनिवडणुकीतील खमंग चर्चा, वाचा कुठे झालं हे….

एससीईआरटीने यंदा दहावी आणि बारावीच्या शंभर टक्के अभ्यासक्रमावरील विषयनिहाय प्रश्नपेढी तयार केल्या आहेत. त्यामुळे, या प्रश्नपेढ्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करता येणार आहे. प्रश्नपेढी https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question bank available for practice for 10th and 12th students pune print news ccp 14 ssb