चिन्मय पाटणकर

पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांच्या उपयुक्ततेची माहिती बालभारतीकडून ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे संकलित करण्यात आली आहे. मात्र हे सर्वेक्षण ऑनलाइन पद्धतीने करणे, सर्वेक्षणातील प्रश्नावली याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता

यंदा राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने जोडण्यात आली. त्यावर विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या नोंदी करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांच्या उपयुक्ततेचा अभ्यास करण्यासाठी बालभारतीकडून सर्वेक्षण हाती घेण्यात आले. ऑनलाइन फॉर्ममध्ये प्रश्नावली समाविष्ट करून कोऱ्या पानांच्या उपयुक्ततेबाबतची माहिती संकलित करण्यात आली आहे. मात्र ऑनलाइन पद्धतीने सर्वेक्षण करणे, त्याची विश्वासार्हता, त्या सर्वेक्षणात विचारलेल्या प्रश्नांबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत.

आणखी वाचा-देहूच्या नगराध्यक्षांवर स्वपक्षीय नगरसेवकांचाच अविश्वास ठराव

शिक्षण अभ्यासक किशोर दरक म्हणाले, की प्रश्नावलीतील प्रश्न असे तयार करण्यात आले आहेत, की त्याची उत्तरे स्वाभाविकपणे होकारार्थी येतील. म्हणजेच ही पुस्तके चांगली आहेत हे गृहीतक आधीच ठरवण्यात आले आहे. नकारार्थी उत्तरे येण्याची शक्यता असलेले प्रश्नच प्रश्नावलीत विचारलेले नाहीत. त्यामुळे संशोधन पद्धतीचा विचार करता हे सर्वेक्षण सरकारला अपेक्षित निष्कर्षाप्रत पोहोचवणारे वाटते.

शासन निर्णयात एकात्मिक पाठ्यपुस्तकांचे यश तपासण्याबाबत नमूद करण्यात आले होते. त्यामुळे बालभारतीकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र, स्पष्ट अभिप्राय नोंदवण्याची सोय नाही. प्रश्नावलीत दिलेल्या प्रश्नांचीच उत्तरे देण्याची मुभा आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकांच्या वापरातील समस्या, अडचणी, मर्यादा, दोष नेमकेपणाने व्यक्त करण्याची संधी नाही, असे मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी सांगितले.

आणखी वाचा-पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना सिंहगड रस्ता भागात पकडले; चार पिस्तुलांसह काडतुसे जप्त

एकात्मिक पाठ्यपुस्तकांची उपयुक्तता, त्याबाबत शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांचा कल जाणून घेतला जाणार आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षणात अधिक वेळ गेला असता. ऑनलाइन सर्वेक्षणात मोकळेपणाने प्रतिसाद नोंदवणे शक्य होते. तसेच यूडायस क्रमांक, ओटीपी पद्धत वापरली असल्याने सर्वेक्षण विश्वासार्ह आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष लवकरच जाहीर केले जातील. -कृष्णकुमार पाटील, अध्यक्ष, बालभारती