गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ भारतातील राजकीय परिस्थितीवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून दमदार भाष्य करणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आ. के. लक्ष्मण यांनी ९४ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. ‘कॉमन मॅन’ला नायक बनविणाऱ्या या महान व्यंगचित्रकाराच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी सरस्वती लायब्ररी, साहित्यवेध प्रतिष्ठान आणि आरकेप्रेमींतर्फे गुरुवारी (६ नोव्हेंबर) एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते लक्ष्मण यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
औंध येथील आयरीश पार्क या आर. के. लक्ष्मण यांच्या निवासस्थानी सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास कॉसमॉस को-ऑप. बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि ‘लोकमत’चे संपादकर विजय कुवळेकर उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने आर. के. लक्ष्मण यांच्या जुन्या दुर्मिळ व्यंगचित्रांचे प्रदर्शनही भरविले जाणार असल्याचे सरस्वती लायब्ररीचे कैलास भिंगारे यांनी कळविले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा