अंध बांधवांना समाजात स्थान व प्रसारमाध्यमात काम करण्याची संधी मिळावी म्हणून अंधांच्या संकल्पनेतून साकारलेला तसेच अंध व डोळस मित्रांना एकाच व्यासपीठावर आणून थेट शिक्षण, संशोधन, रेडिओवरून परीक्षा व मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी परिपूर्ण असलेल्या एका नावीन्यपूर्ण रेडिओ स्टेशनचा शुभारंभ शुक्रवारी चिंचवड येथे होतो आहे.
संस्थेचे सचिव सतीश नवले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहात सायंकाळी पाच वाजता ‘प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंड’ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अंधांसाठी विशेष कार्य केलेल्या व अंधत्वावर मात करून अपेक्षित ध्येय गाठणाऱ्यांना लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत प्रकाश आमटे यांच्या हस्ते प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. डॉ. महेश देवकर, भूषण तौष्णीवाल, लता कोठूरकर, प्राची गुर्जर यांना प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. ब्रेलवाणी रेडिओ स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. पंडित विद्यासागर, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, नारायण देशपांडे उपस्थित राहणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा