पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीवर बलात्कार आणि गर्भपात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रघुनाथ यांच्यावर न्यायालयामार्फत जामीन रद्द करण्याची प्रकिया सुरु झाली असून ते लवकरच जेरबंद होतील, असे वक्तव्य भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे.

रघुनाथ कुचिकबाबत ज्यावेळी प्रकरण समोर आले. तेव्हा वेळोवेळी मी माझी भूमिका मांडत राहिले. पण त्याच दरम्यान माझ्यावर आरोप देखील झाले. मात्र, ते खोटे असल्याच सिद्ध देखील केले गेले. या संपूर्ण प्रकरणी मी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली आणि त्याच दरम्यान जबाब देखील नोंदविण्यात आला.आता कालच शिवाजीनगर पोलिसांकडून एक पत्र आले आहे. रघुनाथ कुचिक याने जामीन मिळाल्यानंतर ज्या अटी शर्थीचा भंग केला आहे. त्याबाबतची सर्व कागदपत्र न्यायालयामध्ये सादर केली आहे. त्यामुळे आता जामीन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे पत्रात म्हटल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच रघुनाथ कुचिक जेरबंद होईल आणि आमचा शेवटपर्यंत पाठ पुरावा सुरू राहणार असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.

chaggan bhujbal
..तर धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या- छगन भुजबळ
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Santosh Deshmukh murder case Ajit Pawar again consoles Dhananjay Munde  Mumbai news
पुरावे असल्याशिवाय कोणतीही कारवाई नाही; अजित पवारांचा धनंजय मुंडेंना पुन्हा दिलासा
Raigad Guardian minister post , Aditi Tatkare ,
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना – राष्ट्रवादीत खडाखडी 

काय आहे प्रकरण?

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील एका तरुणीने लैंगिक अत्याचार करुन गर्भपात घडवून आणल्याचा आरोप केला होता. या प्रकरणामुळे मागील दोन महिन्यांपासून पुण्यातील राजकारण चांगलेच तापले होते. त्यामध्ये भाजपाच्या नेत्या आणि महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उडी घेतली होती. त्या या प्रकरणावर सतत भूमिका मांडत होत्या. मात्र, आता या प्रकरणाला वेगळच वळण मिळाले. पीडित तरुणीने मला गोव्यात चित्रा वाघ यांनीच डांबून ठेवले होते असा आरोप करत या सर्वांमागे चित्रा वाघ असल्याचा आरोप केलाय.

Story img Loader