अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल गांधी २४ व २५ सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. २५ सप्टेंबरला त्यांचा पुण्यात दौरा आहे. या दौऱ्यामध्ये ते जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.
ठाकरे म्हणाले की, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी राहुल गांधी हे देशभर दौरे करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून २४ सप्टेंबरला नागपूर, तर २५ सप्टेंबरला ते पुण्यात बैठक घेणार आहेत. जिल्हास्तरीय तसेच ब्लॉकस्तरावरील कार्यकर्त्यांशी ते या बैठकीत संवाद साधणार आहेत. नागपूर येथील बैठकीत विदर्भ, मराठवाडय़ातील नांदेड, परभणी, हिंगोली, खान्देशातील नाशिक, मालेगाव येथील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील. पुण्यात बालेवाडी क्रीडासंकुलात होणाऱ्या बैठकीला पश्चिम महाराष्ट्र व इतर जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील.

Story img Loader