लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : चिंचवड विधानसभेतील विविध बूथवर नावाची स्लिप देण्याच्या बहाण्याने भाजप उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
थेरगाव परिसरातील, साने गुरुजी आदर्श विद्यानिकेतन शाळा, जयमल्हार नगर, थेरगाव येथील २९० ते २९३ क्रमांकाच्या बुथवर तर कीर्ती नगर थेरगाव येथील न्यु मिलेनियम, इंग्लिश मेडीयम स्कुल मतदान केंद्रावरील २६४ ते २६८ क्रमांकाच्या बुथवर पैसे वाटप होत असल्याचा आरोप कलाटे यांनी केला आहे. खुलेआम मतदारांना पैसे वाटपाच्या या प्रकारमुळे आदर्श आचार आचारसंहिता भंग होत आहे. हा प्रकार तात्काळ थांबवून संबंधीतांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी चिंचवड विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान, भाजपने हे आरोप फेटाळले आहेत.
आणखी वाचा-कसब्या पाठोपाठ खडकवासल्यात सर्वाधिक मतदान, दुपार पर्यंत २९ टक्के मतदानाची नोंद
चिंचवडमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे राहुल कलाटे आणि भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांच्यात तगडी लढत होत आहे. त्यांच्यासह इतर २१ उमेदवार जनतेचा कौल अजमावत आहेत.