चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हे विजयी झाले आहेत. विजयानंतर जगताप यांनी महायुतीच्या नेत्यांचे आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांमधील कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. केवळ अमोल कोल्हे यांच्या हट्टपायी चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचा आरोप शंकर जगताप यांनी केला आहे. शंकर जगताप हे प्रसार माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शंकर जगताप म्हणाले, हा विजय चिंचवड मतदारसंघातील जनतेचा आहे. हा विजय दिवंगत लक्ष्मण जगताप यांना समर्पित करतो. माझ्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेतले आहे. पुढे ते म्हणाले, आयत उमेदवार दिल्याने शरद पवारांच्या पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आहे. अमोल कोल्हे यांच्या हट्टापायी चिंचवडमध्ये पराभव झाला आहे. हा पराभव शरद पवारांच्या जिव्हारी लागणारा आहे.

आणखी वाचा-हडपसर मध्ये निकाल बदलणार? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रशांत जगताप यांची मागणी

पुढे ते म्हणाले, शरद पवार यांच्यामुळे लाखाच्या घरात मते पडली अन्यथा कलाटे यांना ५० हजार मते पडली असती. पुढे ते म्हणाले, आगामी महानगर पालिका निवडणूक महायुती म्हणून आम्ही लढणार असून पुन्हा महानगर पालिकेवर महायुतीची सत्ता येईल. असा विश्वास ही जगताप यांनी व्यक्त केला आहे. मंत्री पदाबाबत शंकर जगताप यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. चिंचवडमध्ये भाजप च्या कार्यकर्त्याला मंत्री पद मिळत असेल तर त्याच स्वागत करतो.