चिंचवड विधानसभा मतदारसंघात एका फ्लेक्सची जोरदार चर्चा रंगली आहे. एका अपक्षाची उमेदवारी खोक्यातून.. नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी.. एकदम ओके डोक्यातून… खरा शिवसैनिक अशा आशयाचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. हा फ्लेक्स बंडखोर राहुल कलाटेंविरोधात असल्याचे बोलले जात आहे. तर, राहुल कलाटे यांनी आरोपांचे खंडन केले असून, “खरा शिवसैनिक असे फ्लेक्स लावूच शकत नाही”, असे म्हटले आहे. मूलभूत प्रश्नावरील लक्ष विचलित करण्यासाठी ही स्टंटबाजी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लागली असून अनेक नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास आघाडीतील चित्र स्पष्ट झाले आहे. परंतु, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे यांच्यासह बंडखोर राहुल कलाटे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याचा थेट फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाराज असलेल्या शिवसैनिकाने चिंचवड मतदारसंघात लक्षवेधी फ्लेक्स लावले असून त्याची चर्चा सर्वत्र आहे. राहुल कलाटे हे काही महिन्यांपूर्वी भाजपा असेल किंवा शिंदे गट असेल यांच्या संपर्कात होते. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतदेखील त्यांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीत बिघाडी केल्याचे चित्र आहे. यामुळे नाराज असलेल्या शिवसैनिकाने चिंचवड मतदारसंघात फ्लेक्सबाजी केली आहे का? असा प्रश्न उपस्थित आहे.

हेही वाचा – करोना रुग्णसंख्या सरकारी आकडेवारीपेक्षा १७ पट अधिक, बनारस हिंदू विद्यापीठाचा अहवाल

शिवसेनेतून राहुल कलाटेंची हकालपट्टी होणार? कलाटे म्हणाले…

मी २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढलो. तेव्हाही शिवसेनेकडून कारवाई होईल, असे बोलले जात होते. मात्र, नेत्यांनाही लक्षात येत असेल की माझ्यावर अन्याय होत आहे. ही भावना तेव्हाही जाणवली होती. त्यामुळेच तेव्हाही माझ्यावर कारवाई झाली नव्हती. पण, आता काय कारवाई होणार याकडे लक्ष देऊन आहे, असे राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा – पुणे : पोलिसांच्या तत्परतेमुळे तेलंगणातील १३ वर्षांची मुलगी सुखरूप, खडकी पोलिसांनी मुलीला कुटुंबीयांकडे सोपविले

बंडखोर राहुल कलाटेंचे अजित पवारांना उत्तर

राहुल कलाटेंच्या बंडामागे मोठ्या नेत्यांचा हात आहे, असे विधान अजित पवार यांनी केले होते. यावर राहुल कलाटे यांनी उत्तर दिले असून, त्यांनी म्हटले की, मी अजित पवारांकडे आणि महाविकास आघाडीकडेच उमेदवारी मागत होतो. त्यामुळे दादांचे काय संकेत असतील हे त्यांनाच विचारावे लागेल. मी बाकी कोणत्याही नेत्याला कधीच भेटायला गेलो नाही. मी फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडेच गेलो होतो. इतर नेत्यांकडे गेलो असतो तर मीडियाने ठेवलेल्या ट्रॅपमध्ये आलोच असतो.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul kalate on flex in chinchwad kjp 91 ssb