फर्ग्युसन रस्त्यावरील क्युरिओसिटी रेस्टॉरंट येथे सुरू असलेल्या बेकायदा पार्टीवर डेक्कन पोलिसांनी छापा टाकून ती उधळली. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे हॉटेल एका पोलीस निरीक्षकाच्या पत्नीच्या नावावर असल्याचे समजते.
याबाबत डेक्कन पोलीस कर्मचारी मोहन तुळशीराम सारूक यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रतीक श्रेणीक नानावटी (वय ३२, रा. फ्लोरिडा इस्टेट, मुंढवा), चेतन मारुती गावडे (रा. काकडे टेरेस, वारजे माळवाडी), चिन्मय आनंद दिवाकर (रा. मयूर कॉलनी, कोथरूड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन रस्त्यावरील मिलेनियम प्लाझा इमारतीच्या टेरेसवर क्युरिओसिटी रेस्टॉरंट नावाचे हॉटेल आहे. हे प्रतीक नानावटी याने चालविण्यास घेतले आहे. या हॉटेलमध्ये बेकायदा पार्टी होणार असल्याची माहिती नागरिकांनी डेक्कन पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी दुपारी या पार्टीवर छापा टाकला. त्यावेळी पार्टीमध्ये सत्तर ते ऐंशी तरुणी त्या ठिकाणी होते. या ठिकाणी मोठय़ा आवाजात स्पीकर सुरू होते. पोलिसांनी या ठिकाणाहून स्पीकर आणि दारू असा चार हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या हॉटेलमधील तरुण-तरुणींकडे चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले. हे हॉटेल एका पोलीस निरीक्षकाच्या पत्नीच्या नावावर असल्याचे समजते. त्यांनी हे नानावटी याला चालविण्यास दिले आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलीस निरीक्षकाशी संबंधित हॉटेलमधील बेधुंद पार्टी पोलिसांनी छापा टाकून उधळली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन रस्त्यावरील मिलेनियम प्लाझा इमारतीच्या टेरेसवर क्युरिओसिटी रेस्टॉरंट नावाचे हॉटेल आहे. हे प्रतीक नानावटी याने चालविण्यास घेतले आहे.
First published on: 29-06-2014 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raid crime unauthorised alcohol party