पुणे : कोंढव्यातील मॅश हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तंबाखूजन्य पदार्थ, हुक्का पात्र असा ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी मॅश हाॅटेलचे मालक अली इरानी (वय ६६, रा. उंड्री), व्यवस्थापक अली सय्यद (वय २८, रा. येरवडा), कामगार थॉमस सुजय मंडल (वय ३०, रा. उंड्री), रंजन समर्थ पत्रा (वय २७, रा. उंड्री), राजकुमार वामन पंडीत (वय ३०, रा. महमदवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महिनाभरापूर्वी कोंढव्यातील एका हाॅटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला होता.

drones, girgaon chowpatty, missing children girgaon,
गिरगाव चौपाटीवर ड्रोन उडवणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा, हरवलेली ३९ मुले कुटुंबियांकडे सुपूर्द
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
Manipur Curfew
Curfew  in Manipur : आता घराबाहेर पडण्यासही मनाई; मणिपूरमध्ये नेमकी परिस्थिती काय?
Fraud by fake police officers by showing fear of arrest Mumbai news
तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी अटकेची भीती दाखवून लुटले; खारमध्ये गुन्हा दाखल
security tightened in manipur following fresh violence
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ड्रोन हल्ल्यांविरोधात इम्फाळमध्ये मोर्चा, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा
Police beaten, encroachment, Pimpri,
पिंपरी : पोलीस ठाण्यासमोरील अतिक्रमण काढताना पोलिसांनाच मारहाण
Vasind police station, three employees Suspension,
वासिंद पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्याचे निलंबन, तरुणाच्या मृत्यूनंतर ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
Outrage in Israel over hostage killing
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये संताप,नेतान्याहू जबाबदार असल्याचा आरोप; युद्ध थांबवण्याची मागणी

हेही वाचा – चेरापुंजीमध्ये इतिहासातील उच्चांकी तापमान; जाणून घ्या, तापमान वाढ का झाली

मॅश हाॅटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कोंढव्यातील न्याती चौक परिसरात असलेल्या हाॅटेलवर छापा टाकून कारवाई केली. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक लेखाजी शिंदे आणि पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा – जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबईतील कमला मिल परिसरात असलेल्या हुक्का पार्लरमध्ये आग लागून ग्राहकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर राज्य शासनाने मुंबई, पुणेसह राज्यातील वेगवेगळ्या शहरात असलेल्या हुक्का पार्लरवर बंदी घातली होती. पोलिसांचे आदेश धुडकावून काही हाॅटेलचालक बेकायदा पद्धतीने हुक्का पार्लर चालवित असल्याचे उघडकीस आले आहे.