लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : कात्रज भागात जुगार अड्डयावर भारती विद्यापीठ पोलिसांनी (आंबेगाव) छापा टाकला. पोलिसांनी याप्रकरणी जुगार अड्ड्याचा चालकासह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मोबाइल संच, जुगार खेळण्याचे साहित्य, रोकड असा एक लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी जुगार अड्ड्याचा चालक किशोर सातपुते (रा. दांडेकर पूल), साहिल इब्राहिम साठी (रा. धनकवडी), किरण डिंबळे, रोहिदास गोरड (दोघे रा. पर्वती), हर्षद थोरवे (रा. शुक्रवार पेठ), गणपत सुतार (रा. नऱ्हे), दत्ता जोगी, विराज पाटील, मुन्नवर शेख, इम्रान दलाल (चौघे रा. कात्रज), वसंत वाध (रा. शिवणे), योगेश घुमक (रा. सिंहगड रस्ता), धमेंद्र सिंग (रा. हडपसर), दत्ता सितप (रा. नऱ्हे), राजेश उत्तेकर, लक्ष्मण मानकर (दोघे रा. धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई बालाजी पांचाळ यांनी भारती विद्यापीठ (आंबेगाव) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-कचरा गोळा करण्यासाठी रात्रीही हवी याची सुविधा!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव परिसरात जांभुळवाडी भागात एका इमारतीत किशोर सातपुते, साहिल साठी जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी तेथून पत्ते, १६ मोबाइल संच, रोकड असा मुद्देमाल जप्त केला. मुंबई जुगार अधिनियमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raid on gambling den in katraj area crime against 16 people pune print news rbk 25 mrj