पुणे : खराडी भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तेथून २३ हजार ३७० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
खराडीतील चंदननगर भागात एका पत्राच्या खोलीत पणती पाकोळी, सोरेट जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. एका पत्राच्या खोलीत जुगार खेळण्यात येत होता. पोलिसांनी जुगार अड्डा चालविणारा, तसेच जुगार खेळणारे अशा १७ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनयमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपींना चंदननगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
हेही वाचा – ‘आम्ही दाबणार ‘नोटा’; कसब्यातील फलकाची शहरात चर्चा
अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनीषा पुकाळे आदींनी ही कारवाई केली.