पुणे : लोहगाव परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांकडून २० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
हेही वाचा : पुणे : महिलेला अश्लील भाषेत पत्र पाठवून विनयभंग
लोहगावमधील यश हॅाटेलच्या मागे मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये मटका अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. जुगार घेणाऱ्या आणि खेळणाऱ्या बारा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तेथून २० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, उपनिरीक्षक श्रीधर खडके, अजय राणे, प्रमोद मोहिते, पुष्पेंद्र चव्हाण आदींनी ही कारवाई केली.