पुणे : पुणे – दौंड रेल्वे मार्गावरील पाटस स्थानकावर ब्लॉक घेऊन विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ३ ऑक्टोबरला काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे.
या ब्लॉकमुळे पुणे -सोलापूर -पुणे एक्स्प्रेस, पुणे- बारामती पैसेंजर, पुणे – दौंड पैसेंजर, बारामती – दौंड पैसेंजर, दौंड -पुणे पैसेंजर आणि दौंड- हडपसर पैसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचवेळी काही गाड्या सुटण्याची आणि पोहोचण्याची ठिकाणे बदलण्यात आली आहेत. त्यात २ ऑक्टोबरला इंदूरहून सुटणारी इंदूर – दौंड एक्स्प्रेस ही गाडी पुण्यापर्यंत धावेल. तसेच ३ ऑक्टोबरला दौंडवरून सुटणारी दौंड – इंदूर एक्स्प्रेस ही गाडी पुण्यातून सुटेल. हैदराबादहून सुटणारी हैदराबाद – हडपसर एक्स्प्रेस ही गाडी २ ऑक्टोबरला दौंडपर्यंत धावेल. तसेच ३ ऑक्टोबरला हडपसरवरून सुटणारी हडपसर – हैदराबाद एक्स्प्रेस ही गाडी दौंडमधून सुटेल.
हेही वाचा – सलग सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची झुंबड; मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी
याचबरोबर सोलापूर – पुणे डेमु २ ऑक्टोबरला दौंड – पुणे दरम्यान रद्द राहील. बारामती -पुणे पैसेंजर ३ ऑक्टोबरला दौंड – पुणे दरम्यान रद्द राहील. पुणे- बारामती पैसेंजर ३ ऑक्टोबरला पुणे – दौंड दरम्यान रद्द राहील. हडपसर- सोलापूर डेमू गाडी ३ ऑक्टोबरला हडपसर – दौंड दरम्यान रद्द राहील.
हेही वाचा – काय भारत, काय इंडिया, माणूस म्हणायला लायक आहोत का? उज्जैन घटनेवर अमोल कोल्हे कडाडले
विलंबाने धावणाऱ्या गाड्या
ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस, नागरकोईल – मुंबई, बंगळुरू- मुंबई उद्यान, जम्मूतावी- पुणे झेलम, अमरावती – पुणे आणि कराईकल- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस विलंबाने धावतील.