सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पाबाबत पुणेकरांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या विविध घोषणांचे एकीकडे स्वागत केले जात असतानाच या घोषणा प्रत्यक्षात येतील का, असा प्रश्नही विचारला जात आहे.
– कन्नुभाई त्रिवेदी (प्रवासी संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी)
रेल्वे अर्थसंकल्पात प्रभू यांनी प्रत्येक क्षेत्रातील गोष्टींचा विचार केला आहे. एक चांगला अर्थसंकल्प यंदा आला आहे. जाहीर केलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी झाली, तर रेल्वेची वाहतूक सुधारण्यास मदत होईल व प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील.
– हर्षां शहा (रेल्वे प्रवासी ग्रुप, अध्यक्षा)
प्रवाशांना रेल्वे अर्थसंकल्पातून अनेक बदलांची अपेक्षा होती. मात्र त्यातून काही ठोस मिळालेले नाही. रेल्वेची सुधारणा व सुविधांबाबत पूर्वीपासूनच कामे सुरू आहेत. त्यामुळे काही नवे आणले आहे, असे वाटत नाही. रेल्वेचे बुकिंग ६० दिवसांवरून १२० दिवसांचे केल्याने रेल्वे तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्यांचाच फायदा होणार आहे. सामान्य प्रवाशांना त्याचा फारसा फायदा नाही. काळाबाजार थांबवायचा असेल, तर बुकिंगचा कालावधी कमी व्हावा.
– वाय. के. सिंह (जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे)
पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर रेल्वे अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांसाठी जास्त लोअर बर्थ, महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना, रेल्वेतील स्वच्छतेबाबतचा योजना आदी चांगल्या गोष्टी त्यात आहेत. प्रवासी भाडय़ात वाढ न होणे, हेही प्रवाशांच्या दृष्टीने उपयुक्त आहे.
– हेमंत टपाल (पुणे-मुंबई प्रवासी संघ, अध्यक्ष)
महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा व सुरक्षेच्या चांगल्या योजना रेल्वे अर्थसंकल्पात आणण्यात आल्या आहेत. रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल, बायो व इको फ्रेंडली स्वच्छतागृह, वायफाय आदी चांगल्या योजना आहेत. सर्वसाधारण डब्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णयही योग्य आहे.
– विकास देशपांडे (प्रवासी संघटना)
रेल्वे अर्थसंकल्पातील अजून बरेचसे चित्र स्पष्ट नाही. पण, आतापर्यंतचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक वाटतो आहे. महाराष्ट्र व पुणे विभाग नेहमीच उपेक्षित राहिला आहे. काही भागात रेल्वेही पोहोचली नाही. त्यामुळे राज्याच्या वाटय़ाला काय येते, हे पाहावे लागणार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा