दहशतवादी कारवाईचा धोका लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात असून, प्रवाशांसाठी संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.
पुणे विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या संपर्कासाठी ९५०३०१३७०५, मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्कासाठी ९००४४१४४४४, तर रेल्वे पोलिसांशी संपर्कासाठी ९८३३३३११११ हे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान बेवारस ब्रीफकेस, मोबाइल, लॅपटॉप, जेवणाचा डब्बा आदी वस्तू आढळल्यास किंवा कोणी व्यक्ती ज्वलनशील वस्तू घेऊन प्रवास करताना आढळल्यास त्याबाबत माहिती द्यावी. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास संपर्क क्रमांकावर प्रत्यक्ष बोलून किंवा एसएमएस पाठवून माहिती द्यावी, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. माहिती देताना गाडीचे नाव, क्रमांक, डब्याचा क्रमांक व पुढे येणाऱ्या स्थानकाविषयी माहिती द्यावी, असेही मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.

Story img Loader