पिंपरी : पिंपरी-चिंंचवड शहरातील पहिला उड्डाणपूल अशी ओळख असलेला पिंपरी कॅम्प येथील ‘इंदिरा गांधी उड्डाणपूल’ आणि चिंचवड स्टेशन येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्ग व चिंचवडगावास जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे हे दोन्ही पूल पाडण्याची सूचना रेल्वे विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला केली आहे. रेल्वे विभागाने याबाबत आयुक्त शेखर सिंह यांना पत्र पाठविले आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्ग आणि पिंपरी गावास जोडणारा पुणे-लोणावळा लोहमार्गावरील पिंपरी कॅम्प येथील इंदिरा गांधी उड्डाणपूल हा शहरातील सर्वांत पहिला पूल आहे. या पुलाचे आयुर्मान संपले असून, बांधकाम धोकादायक झाले आहे. हा पूल वाहतुकीस बंद करावा. पूल पाडून टाकण्याबाबत रेल्वे विभागाने महापालिकेस तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यकाळात पत्र पाठविले होते. शहरातील दोन भागांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने महापालिकेने पुलाचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण (स्ट्रक्चर ऑडिट) केले. त्यानंतर पुलाचे मजबुतीकरण करण्यात आले. हे काम सुमारे तीन वर्षे सुरू होते.

Tire killer is going to be tested in three important areas of Thane railway station area
स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Marijuana worth Rs 115 crore seized from Mumbai airport in three months
मुंबई विमानतळावरून तीन महिन्यात ११५ कोटींचा गांजा जप्त
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट
butibori flyover latest marathi news
गडकरींच्या जिल्ह्यातील उड्डाण पूल खचला, एक किमी वाहनांच्या रांगा
Municipal corporation takes action against illegally construction debris in Borivali
बोरिवलीत अनधिकृतपणे राडारोडा टाकणाऱ्यांवर पालिकेची कारवाई
MHADA mega list draw scam No inquiry report on draw even after year
म्हाडा बृहतसूची सोडत गैरप्रकार : एक वर्षानंतरही सोडतीचा चौकशी अहवाल गुलदस्त्यात

हेही वाचा…शेवगा ६०० रुपये किलोवर; दक्षिणेतील पावसामुळे दराचा उच्चांक

शहरातील चिंचवड स्टेशन येथील लोहमार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामास ४७ वर्षे पूर्ण झाली आहेत. ते बांधकाम धोकादायक झाले असून, तो पूल पाडावा, असे पत्र रेल्वेने महापालिकेस नुकतेच पाठविले आहे. या पुलाशेजारी महापालिकेने १५ वर्षांपूर्वी समांतर पूल बांधला आहे. जुना पूल तोडावा लागणार असल्याने येथील वाहतूक समस्या अधिक गंभीर होणार आहेेत. हे दोन्ही पूल महापालिका पाडणार की, नव्याने डागडुजी करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा…पुणे : पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

पिंपरी आणि चिंचवड स्टेशन येथील लोहमार्गावरील उड्डाणपुलाचे आयुर्मान संपले आहे. बांधकाम धोकादायक झाले असून पूल पाडण्याबाबत रेल्वे विभागाचे पत्र प्राप्त झाले आहे. या दोन्ही पुलाचे काय करायचे, या संदर्भात आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्यासाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

Story img Loader