पुणे: पुणे-सोलापूर लोहमार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आल्याने घोरपडीतील रेल्वे फाटक गुरुवारी (२६ ऑक्टोबर) रात्री आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. रेल्वे फाटक परिसरातून घोरपडी-मुंढव्याकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
घोरपडीतून मुंढव्यातील पारपत्र कार्यालयाकडे जाणारी वाहने रेल्वे फाटक ओलांडून जातात. रेल्वे प्रशासनाकडून घोरपडी-मुंढवा रस्त्यावरील (लेव्हल क्राॅसिंग) फाटक गुरुवारी रात्री आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे-सोलापूर लोहमार्ग दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.
हेही वाचा… पुणे: कामावरुन काढल्याने पेट्रोल पंपाची तोडफोड
घोरपडीतून मुंढव्याकडे जाणारी, तसेच मुंढव्याहून येणाऱ्या वाहनचालकांनी या मार्गाचा वापर टाळावा. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.