पुणे : पिंपरी ते दापोडी रेल्वे स्थानकादरम्यान असलेले कासारवाडी येथील रेल्वे फाटक रस्ते वाहतुकीसाठी १६ ते २० ऑक्टोबर या पाच दिवसांच्या कालावधीत सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून कळविण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे विभागातील पुणे-लोणावळा मार्गावरील या रेल्वे फाटकाच्या विभागात आवश्यक दुरुस्ती आणि देखभालीचे काम करण्यात येणार असल्याने पाच दिवसांच्या कालावधीत संध्याकाळी पाचपर्यंत रस्ते वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी जवळच असलेला रेल्वे भुयारी मार्ग किंवा रेल्वे उड्डाणपुलाच्या पर्यायी माध्यमातून बंदच्या कालावधीत वाहतूक करावी, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway gate kasarwadi closed five days railway stations roads for transportation pune print news ysh