देशाचा अर्थसंकल्प आज सादर होत असताना पुणेकरांसाठी देखील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. करोना महामारीच्या सुरूवातीच्या काळात वाढवण्यात आलेले पुणे रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर आजापसून पुन्हा एकदा दहा रुपये करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांची सामान्य विक्री पुन्हा सुरू झाली आहे. आजपासून (१ फेब्रुवारी) प्लॅटफॉर्म तिकीट प्रति व्यक्ती १० रुपये या दराने उपलब्ध होणार आहे. करोना महामारीमुळे रेल्वे स्थानकावर होणारी अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी या तिकीटाची किंमत वाढवून ५० रुपये करण्यात आली होती.

मात्र आता करोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत असल्याने आणि शहरातील कोविड स्थितीचा आढावा घेऊन पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर पूर्ववत करण्यात आल्याचे दिसत आहे.

रेल्वेस्थानकांवरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे या उद्देशाने तिकीट दर वाढवले गेल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. तर, वृद्ध, दिव्यांग, रूग्ण, गरोदर आदींसह मदतीची आवश्यकता असणाऱ्यांनाच प्लॅटफॉर्म तिकीट दिले जात होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway platform ticket price in pune will be rs 10 from today instead of rs