पुण्याच्या देहूरोड ते शेलारवाडी दरम्यान रेल्वे रुळावर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रेल्वे रुळावर झोपून स्टंटबाजी करताना दोन तरुण रेल्वे पोलिसांना आढळले होते. विक्रम राठोड आणि महेश रबारी अशी तरुणांची नाव आहेत. आरपीएफ पोलिस निरीक्षक अमित कुमार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

हेही वाचा >>> बाबा रामदेव यांचं महिलांबद्दल वादग्रस्त विधान : रुपाली पाटील संतापल्या; म्हणाल्या, “अमृता फडणवीसांनी सणकन…”

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हिडिओ पोष्ट करण्यासाठी दोन तरुण चक्क रेल्वे रुळावर स्टंटबाजी करत होते. ही घटना देहूरोड ते शेलारवाडी दरम्यान रेल्वे रुळावर घडली आहे. रेल्वे रुळावर स्टंटबाजी करत व्हिडिओ आणि फोटो काढत असताना दोघांना ताब्यात घेण्यात आलं. इन्स्टग्राम, व्हाट्सएप स्टेट्स, फेसबुक स्टेट्स, अशा सोशल मीडियावर व्हिडिओ पोष्ट करण्यासाठी नको ते धाडस तरुण, तरुणी करताना दिसत आहे. तरुणांनी अशा प्रकारची स्टंटबाजी टाळावी असे आवाहन अमित कुमार यादव यांनी केलं आहे. स्टंटबाजी करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. 

Story img Loader