पुणे : रेल्वे मंत्रालयाने स्थानकांचा विकास करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत देशभरातील १ हजार ३०९ स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. त्यात पुण्यासह लोणावळा, दौंड, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि इतर स्थानकांचा समावेश आहे. केंद्र सरकारने अमृत भारत स्थानक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे.

या योजनेंतर्गत देशभरात १ हजार ३०९ स्थानकांचा विकास केला जाणार आहे. यात पुण्यासह अनेक स्थानकांचा समावेश आहे. यामध्ये अकोला, भुसावळ, चंद्रपूर, कोल्हापूर, दादर, गुलबर्गा, जळगाव, कल्याण, कुर्ला, मलकापूर, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर, नाशिक रोड, सोलापूर, ठाणे, वर्धा, लोणावळा, मनमाड, अमरावती, मिरज, अहमदनगर, माथेरान, चाळीसगाव, देवळाली, शेगाव, कराड, सांगली, दादर, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल, धरणगाव या स्थानकांचा समावेश आहे.

Maharera builders Crore outstanding Homebuyer Thane, Raigad, Palghar
जिल्हा प्रशासन ढिम्म .. महारेरा हतबल ! ठाणे, रायगड, पालघर मधील घरखरेदीदारांचे २०२.७८ कोटींचा परतावा थकीत
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Loksatta coverage on Mumbai BMC budget 2025 in marathi
रुपये ७४,४२७,४१,००० फक्त!, मुंबई महापालिकेच्या जवळपास पाऊण लाख कोटींच्या अजस्र अर्थसंकल्पातून होणार काय?
Rajewadi Station , Purandar Airport ,
पुणे : राजेवाडी स्थानकापासून पुरंदर विमानतळापर्यंत रेल्वे मार्गिका, एकात्मिक वाहतूक आराखड्यात प्रकल्प प्रस्तावित
Redevelopment Building Permit Terms and Conditions
एकाचा पुनर्विकास दुसऱ्याला नसावा त्रास
fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
Navi Mumbai , APMC , Unauthorized Construction ,
नवी मुंबई : एपीएमसीतील अनधिकृत बांधकामाला प्रशासनाचे अभय? कारवाई करून देखील धान्य बाजारातील अनधिकृत बांधकाम सुरूच
pune metro new routes
Pune Metro: पुण्यातील वाहतूक खोळंब्यावर १,२६,४८९ कोटींचा तोडगा; जिल्हा नियोजन समितीत CMP सादर!

या योजनेत स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. यामुळे या स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून स्थानकांचा विकास करण्यावर यात भर दिला जाणार आहे. स्थानकांचा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करून सुविधांचे नियोजन केले जाणार आहे. प्रत्येक स्थानकाचा विकास करताना तेथील रोजची सरासरी प्रवासी संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. याचबरोबर स्थानकाची सध्याची रचनाही विचारात घेतली जाणार आहे. प्रामुख्याने प्रवासीकेंद्रित सुविधा स्थानकांवर विकसित केल्या जातील. स्थानकाच्या बाह्य रूपासोबत अंतर्गत भागातही सुधारणा केल्या जाणार आहेत.

कसा होणार विकास?

– स्थानक परिसरातील वाहतूक सुधारणा

– स्थानक परिसराचे सुशोभीकरण

– स्थानक प्रवेशद्वारांचा विकास

– स्थानकावर प्रतीक्षागृहांची उभारणी

– स्वयंचलित जिन्यांची उभारणी

– स्थानकातील अंतर्गत रचनेत सुधारणा

– स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा

– एक देश, उत्पादन योजनेंतर्गत विक्री केंद्र

– मोफत वाय-फाय किऑस्क

Story img Loader