पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या दोन फेऱ्या शुक्रवारी (४ नोव्हेंबर) रद्द करण्यात येणार आहेत. लोहमार्गावरील तांत्रिक कामांमुळे रेल्वेच्या वाहतुकीत हा बदल करण्यात येणार असल्याचे पुणे रेल्वेकडून कळिवण्यात आले आहे. पुणे रेल्वे स्थानकातून सकाळी ९.५५ वाजता लोणावळ्यासाठी सुटणारी लोकल शुक्रवारी धावणार नाही.
त्याचप्रमाणे दुपारी २.५० वाजता लोणावळा स्थानकातून पुण्यासाठी सोडण्यात येणारी लोकल रद्द करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा विभागात काही तांत्रिक कामे करण्यात येणार असल्याने लोकलच्या या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. या दोन लोकल वगळता पुणे ते लोणावळा दरम्यान सकाळी आणि दुपारी सुटणाऱ्या लोकलच्या फेऱ्या नियमित सुरू असतील. प्रवाशांनी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पुणे रेल्वेकडून करण्यात आले आहे.