अनेक वेळा प्रवाशांना एखाद्या ठिकाणी जायचे, तर त्या जवळचे स्थानक माहिती नसते. काही स्थानकांची नावे अशी असतात, की ती बाहेरील प्रवाशांनी ऐकलेलीही नसतात. रेल्वे तिकिटाचे आरक्षण करताना ही समस्या प्रामुख्याने जाणवते. यावर उपाय म्हणून आता रेल्वेने शेजारील मोठे शहर अथवा लोकप्रिय ठिकाणाचे नाव स्थानकाऐवजी वापरण्याचा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुकर होणार आहे.
हेही वाचा >>> पुणे : तांदळाची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय
रेल्वे स्थानकांची नावे ही अनेक ठिकाणी शहरांपेक्षा वेगळी असतात. त्यामुळे बाहेरील प्रवाशांना याची माहिती नसते. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करताना अनेक वेळा गोंधळ होतो. ऑनलाइन तिकीट नोंदणी करताना ही समस्या सर्वाधिक समस्या जाणवते. त्यामुळे रेल्वेने छोट्या स्थानकांच्या नावाऐवजी आपल्या प्रणालीतील त्या नजीकच्या लोकप्रिय ठिकाण अथवा शहराचे नाव वापरण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांनी एखाद्या ठिकाणाचे नाव टाकल्यानंतर त्या परिसरातील स्थानके दिसतील आणि प्रवासाचे नियोजन करणे अधिक सोपे होईल.
हेही वाचा >>> मद्यधुंद सहायक फौजदाराची वाहन चालकाकडे पैशांची मागणी… या कारवाईने उतरली नशा
सध्या रेल्वेने देशभरात १७५ स्थानकांची नावे शेजारील लोकप्रिय ठिकाणे आणि शहरांशी जोडली आहे. आता प्रवाशांनी काशी, खाटू श्याम, बद्रिनाथ, केदारनाथ, वैष्णोदेवी या लोकप्रिय तीर्थस्थळांना जायचे असल्यास त्याच नावाने रेल्वे गाड्यांचा शोध घेता येईल. त्यांना आधीप्रमाणे या तीर्थस्थळांच्या शेजारील रेल्वे स्थानकांच्या नावाने गाड्या शोधाव्या लागणार नाहीत. याचबरोबर उपनगरी स्थानके मुख्य शहरांच्या नावाशी जोडला जाणार आहेत. कारण अनेक मोठ्या शहरांत उपनगरांमध्ये रेल्वे स्थानके आहेत. त्यांची नावे बाहेरील प्रवाशांना फारशी माहिती नसतात. याचाही फायदा प्रवाशांना होणार आहे.
लोकप्रिय ठिकाणांशी जोडलेली स्थानके
– बनारस : वाराणसी शहर, वाराणसी जंक्शन, दिलवा, बनारस, राजा तालाब, सारनाथ
– लखनौ : आलमनगर, ऐशबाग, बक्षी का तालाब, बादशहानगर, डालीगंज, लखनौ शहर, गोमतीनर, मानकनगर, लखनौ एनई, लखनौ ईआर
– भुवनेश्वर : भुवनेश्वर, बाणी बिहार, बारंग, लिंगराज टेंपल रोड, मंचेश्वर – अहमदाबाद : आम्बली रोड, असारवा जंक्शन, चांदखेडा रोड, चांदलोडिया, गांधीग्राम, सरदारग्राम, सारखेज, वस्त्रापूर, साबरमती बीजी