पुणे : ओडिशातील बालासोर येथील दुर्घटनेनंतर रेल्वेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे विशेष सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात आले. ईशान्य सीमावर्ती रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी सीताराम सिंकू यांनी हे लेखापरीक्षण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे विभागाचे विशेष सुरक्षा लेखापरीक्षण व तपासणी सिंकू यांनी २३ व २४ जूनला केली. या अंतर्गत पुणे रेल्वे स्थानक, यार्ड, कोचिंग दुरूस्ती डेपो, पुणे आरआरआय आणि आणि सातारा येथील स्थानक, यार्ड, रनिंग रूम आदीची पाहणी करण्यात आली. तसेच, त्यांनी रेल्वे गाडी परिचालनाशी संबंधित कर्मचारी लोको पायलट, स्थानक व्यवस्थापक, गाडी व्यवस्थापक ( गार्ड), सिग्नल व लोहमार्ग देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले.

हेही वाचा >>> पुणे मेट्रोच्या कामात सरकारी भांडणाचा खोडा ! १५ दिवसांपासून काम बंद

या तपासणीत पुणे विभागाचे मुख्य लोहमार्ग अभियंता राम गोपाल, मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता के. के. श्रीवास्तव, मुख्य यांत्रिक अभियंता के. एन. एस. यादव व ए. व्ही. पुरोहित, उपमुख्य सुरक्षा अधिकारी (वाहतूक) अशेश्वर झा आणि उपमुख्य सुरक्षा अधिकारी (सिग्नल व दूरसंचार) आशिष कुमार सिन्हा यांचा सहभाग होता. अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्यासह विभागीय सुरक्षा अधिकारी देवेंद्र कुमार हेही पाहणीत सहभागी होते, अशी माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी दिली.

विभागीय कार्यालयात सुरक्षा आढावा बैठक

या पाहणीनंतर सिंकू यांनी विभागीय कार्यालयात विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह आणि विभागातील शाखा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत रेल्वे संचालनाच्या आवश्यक सुरक्षा नियमांबाबत सविस्तर चर्चा झाली. विभागात होत असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून आवश्यक सूचना केल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railways took a decision after the balasore accident pune print news stj 05 ysh
Show comments