सुगंधी सुपारी-माव्यावरील बंदीविरोधात राज्यातील पानटपरीचालक एकत्र आले आहेत. बिडी-तंबाखू व्यापारी संघटनेतर्फे गुरुवारी (८ ऑगस्ट) होणाऱ्या पान संघटनांच्या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये भावी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.
पुणे पान असोसिएशनचे अध्यक्ष सुनील खडके, शरद मोरे आणि कमलेश सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरकारला सर्वाधिक महसूल देणाऱ्या सिगरेटची विक्री बंद करण्याबाबतचे धोरणही या मेळाव्यामध्येच ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या बंदीच्या निर्णयामुळे पानटपरीचालकांवर बेकारीची कु ऱ्हाड कोसळली असून आम्हाला दारूचा परवाना दिल्यास पान दुकानामध्ये बिअर विकू, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी दिलेल्या माहितीमुळे नागरिकांची दिशाभूल होत आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच आहे. राज्यभरामध्ये पाच लाख पानटपरीधारक असून त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या ५० लाखांच्या घरामध्ये आहे, असे सांगून सुनील खडके म्हणाले, सिगरेट निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये सरकारचेच ३२ टक्के शेअर्स आहेत. त्यामुळे सिगरेटऐवजी सुगंधी सुपारी आणि मावा यावर बंदी घालून छोटय़ा व्यावसायिकांच्या पोटावर गदा आणली आहे. बंदीच आणायची असेल, तर तंबाखू लागवडीपासून आणावी, अशी मागणी त्यांनी केली.
… तर पान दुकानामध्ये बिअर विकू
राज्य सरकारच्या बंदीच्या निर्णयामुळे पानटपरीचालकांवर बेकारीची कु ऱ्हाड कोसळली असून आम्हाला दारूचा परवाना दिल्यास पान दुकानामध्ये बिअर विकू, अशी मागणी पुणे पान असोसिएशनतर्फे करण्यात आली.
First published on: 07-08-2013 at 02:41 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raily of paan shop owners on 8 august