सुगंधी सुपारी-माव्यावरील बंदीविरोधात राज्यातील पानटपरीचालक एकत्र आले आहेत. बिडी-तंबाखू व्यापारी संघटनेतर्फे गुरुवारी (८ ऑगस्ट) होणाऱ्या पान संघटनांच्या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये भावी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.
पुणे पान असोसिएशनचे अध्यक्ष सुनील खडके, शरद मोरे आणि कमलेश सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरकारला सर्वाधिक महसूल देणाऱ्या सिगरेटची विक्री बंद करण्याबाबतचे धोरणही या मेळाव्यामध्येच ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या बंदीच्या निर्णयामुळे पानटपरीचालकांवर बेकारीची कु ऱ्हाड कोसळली असून आम्हाला दारूचा परवाना दिल्यास पान दुकानामध्ये बिअर विकू, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी दिलेल्या माहितीमुळे नागरिकांची दिशाभूल होत आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच आहे. राज्यभरामध्ये पाच लाख पानटपरीधारक असून त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या ५० लाखांच्या घरामध्ये आहे, असे सांगून सुनील खडके म्हणाले, सिगरेट निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये सरकारचेच ३२ टक्के शेअर्स आहेत. त्यामुळे सिगरेटऐवजी सुगंधी सुपारी आणि मावा यावर बंदी घालून छोटय़ा व्यावसायिकांच्या पोटावर गदा आणली आहे. बंदीच आणायची असेल, तर तंबाखू लागवडीपासून आणावी, अशी मागणी त्यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा