पुणे : पावसामुळे फळभाज्यांच्या मागणीत घट झाली आहे. मागणी कमी झाल्याने फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. आषाढी एकादशीमुळे भुईमुग शेगांच्या मागणी वाढ झाली आहे.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (१४ जुलै) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून मिळून १ टेम्पो तोतापुरी कैरी, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी २ टेम्पो कोबी, कर्नाटकातून ३ टेम्पो घेवडा, ३ टेम्पो पावटा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून मिळून ५ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून ९ टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून ५ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील अडते निखिल भुजबळ यांनी दिली.

Increase in the price of vegetables at the wholesale market in Shri Chhatrapati Shivaji Market Yard pune news
कोथिंबिर, अंबाडी, चुका, चवळईच्या दरात वाढ; बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
pavana dam
पिंपरी : उन्हाचा चटका वाढला; पवना धरणात किती आहे पाणीसाठा?
fruits export clusters
राज्यात फळ निर्यातीसाठी तीन क्लस्टर, जाणून घ्या, कोणत्या फळासाठी, कुठे होणार क्लस्टर
soybean news in marathi
नोंदणी केलेल्या पाच हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अजूनही रखडली, शासनाकडे मुदत वाढवण्याची मागणी
pune vegetable prices marathi news
पुणे : आले, लसूण, काकडी, ढोबळी मिरची, मटारच्या दरात घट
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
nikki tamboli and samir choughule
Video: निक्की तांबोळी आणि समीर चौघुले यांनी सांगितली चमचमीत बटाटावड्याची रेसिपी; पाहा व्हिडीओ

हेही वाचा…पुणे : घरफोडी करून दागिने लपवले मेट्रो स्थानकाच्या जिन्याजवळ

पुणे विभागातून सातारी आले ५०० गोणी, भेंडी , भेंडी, गवार, कोबी, काकडी प्रत्येकी ५ टेम्पो, टोमॅटो पाच हजार पेटी, हिरवी मिरची ३ टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, काकडी ५ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, कोबी ५ टेम्पो, फ्लॉवर ८ टेम्पो, भुईमूग शेंग २०० गोणी, तांबडा भोपळा १० टेम्पो, गावरान कैरी २ टेम्पो, कांदा १०० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

हेही वाचा…“तुमचा पिस्तूल परवाना रद्द का करू नये?”, IAS पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांना पुणे पोलिसांची नोटीस

पालेभाज्यांच्या दरात घट

मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. पालेभाज्यांना मागणी कमी झाल्याने दरात घट झाली आहे. घाऊक बाजारात मेथीच्या एका जुडीमागे १३ रुपयांनी घट झाली. कोथिंबिर, शेपू, कांदापातीच्या दरात जुडीमागे ५ रुपये, पालकच्या दरात ३ रुपये, राजगिरा,चुका, चवळईच्या दरात प्रत्येकी २ रुपयांनी घट झाली आहे. तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरेच्या दीड लाख जुडी, मेथीच्या एक लाख जुडींची आवक झाली. पावसामुळे पालेभाज्या भिजल्या असून, प्रतवारीवर परिणाम झाला आहे. चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांना मागणी असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.

Story img Loader