पुणे : Holi 2023 Celebration उन्हाच्या झळांनी ग्रासलेल्या पुणेकरांना सोमवारी पडलेल्या पावसाच्या सरींनी काहीसा दिलासा दिला. कोथरुड, स्वारगेट, डेक्कन, कॅंप, पेठांच्या परिसरासह शहरातील विविध भागांमध्ये संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. वारजे, बावधन, बाणेर परिसरात मात्र पावसाची नोंद झाली नाही. गेले काही दिवस शहरातील कमाल तापमानाने ३० अंश सेल्सिअसच्या वर गेल्यामुळे पुणेकरांना उन्हाच्या झळांनी ग्रासले होते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून रात्रीचे तापमानही १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवण्यात येत होते. त्यामुळे दिवसा आणि रात्रीही उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या हलक्या सरी आणि त्यापाठोपाठ आलेल्या गारव्याने काहीसा दिलासा दिला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारपर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरींचा इशारा दिला आहे. मंगळवारी राज्याच्या काही भागात गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा