पुण्यासह राज्याच्या काही भागात शुक्रवारी पावसाचे वातावरण होते. पुण्यात ५ मिलिमीटर, रत्नागिरी येथे २४, तर नागपूर येथे १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, हे वातावरण तात्पुरते असून, रविवारपासून पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
पुण्यात गुरुवारी आणि शुक्रवारी पावसाच्या चांगल्या सरी पडल्या. त्याचबरोबर राज्याच्या काही भागातही अशीच स्थिती होती. शुक्रवारी दिवसभरात पुण्यात ५ मिलिमीटरची नोंद झाली. याचबरोबर राज्यात इतरत्र अहमदनगर (०.९), कोल्हापूर (१), महाबळेश्वर (७), मुंबई (४), अलिबाग (६), रत्नागिरी (२४), उस्मानाबाद (३), चंद्रपूर (५), नागपूर (१४) येथेही पावसाची नोंद झाली. शनिवारीसुद्धा काही भागात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पावसाचे प्रमाण कमी होईल. पुढे ३-४ सप्टेंबरच्या आसपास आतासारखीच स्थिती असेल. मात्र, मोठय़ा प्रमाणात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता नाही, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Aug 2015 रोजी प्रकाशित
पावसाचे वातावरण, पण तात्पुरतेच!
. पुढे ३-४ सप्टेंबरच्या आसपास आतासारखीच स्थिती असेल. मात्र, मोठय़ा प्रमाणात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता नाही, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.

First published on: 29-08-2015 at 03:12 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain monsoon climate observatory