राज्याच्या अनेक भागात १८ मार्चपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दरम्यान चार नंतर पुणे शहर आणि परिसरातही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र बघायला मिळाले.
हेही वाचा… पुणे : कंपनीच्या मालाची परस्पर विक्री करून व्यवस्थापकाने घातला ७२ लाखांचा गंडा
हेही वाचा… पुणे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन पथकाला थकबाकीदाराकडून शिवीगाळ..!
तर रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, औरंगाबाद, नाशिक, जालना, हिंगोली, लातूर या भागात देखील पुढील काही तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागामार्फत करण्यात आले आहे.