पुणे : र्नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतून शनिवारी (१५ ऑक्टोबर) परतीचा प्रवास केला असून, पुढील दोन दिवसांत बहुतांश विदर्भातून मोसमी वारे परत फिरणार आहेत. या कालावधीत पुढील तीन दिवसांत विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र वगळता मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, पुणे, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दिवाळीच्या आधी काही दिवस पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. मोसमी वारे सध्या राज्यातून परतीचा प्रवास करीत आहेत.

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांतून मोसमी वारे माघारी फिरले आहेत. राजस्थानमधून २० सप्टेंबरला परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर उत्तर भारतात मोठा पाऊस झाला. हंगामाचा कालावधी संपल्यानंतर १ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातही मोठय़ा पावसाने हजेरी लावली. गेल्या १५ दिवसांत राज्यात सरासरीच्या तुलनेत ७३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातून मोसमी वारे माघारी गेले असल्याने या भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. विदर्भातही आता मोसमी पावसाचा जोर घटतो आहे. पुढील दोन दिवसांत विदर्भातील आणखी काही भागांतून मोसमी पाऊस परतीचा प्रवास करणार असल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र वगळता कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अनेक ठिकाणी १६ ते १८ या तीन दिवसांच्या कालावधीत पावसाची शक्यता आहे. कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Dharavi Redevelopment Dharavi Adani Small and Micro Enterprises
धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला

पावसाची शक्यता कुठे?

  • कोकण विभागातील मुंबई, ठाणे भागांत १६, १७ ऑक्टोबर, तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत पावसाची शक्यता आहे.
  • पश्चिम महाराष्ट्रात पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यांतही १६ ते १८ या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
  • मराठवाडय़ात औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, बीड, नांदेड, लातूर आदी भागांतही याच कालावधीत पावसाची शक्यता आहे. विदर्भात १६ ऑक्टोबरपासून अनेक ठिकाणी हवामान कोरडे होईल.