लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पुणे शहराच्या विविध भागांमध्ये दुपारी तीन ते चार दरम्यान गारांसह पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास सोसाट्याच्या वाऱ्यांसह तसेच काही प्रमाणात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला.

शहरात बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, पेठांचा परिसर, कात्रज, वारजे, कोथरुड, कर्वे नगर, सेनापती बापट रस्ता या भागांमध्ये सुमारे अर्धा ते पाऊण तास मुसळधार पाऊस झाला. बिबवेवाडी, कोथरुड, सिंहगड रस्ता परिसरात गारा पडल्या.

हेही वाचा…. पुणे : डेक्कन क्वीनच्या डब्यांतून धूर, ठाकूरवाडी स्थानकानजीक घटना; गाडीला पोहोचण्यास २५ मिनिटे विलंब

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून २२ एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवसा आणि रात्री कमाल तापमानात वाढही सातत्याने नोंदवण्यात येत आहे. त्या बरोबरीने दुपार ते संध्याकाळच्या वेळात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. पावसाच्या सरींची तीव्रता मध्यम स्वरुपाची असली तरी त्या बरोबरीने विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात येत आहे.

Story img Loader