पिंपरी- चिंचवड शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून मोशी येथे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. सुदैवाने यात जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेलं नाही. रस्त्याच्या कडेला असलेलं लोखंडी होर्डिंग सुदैवानं रस्त्यावर पडलं नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अद्याप हे होर्डिंग अधिकृत आहे, की अनधिकृत हे समजू शकल नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – संजोग वाघेरे समर्थकांची फ्लेक्सबाजी, ‘या’ भागात लागले विजयाचे फलक

हेही वाचा – डेंग्यूचा धोका वाढला! जाणून घ्या रोगाची लक्षणे अन् प्रतिबंधाविषयी…

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी येथे दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात रस्त्यालगत असलेलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं. होर्डिंगखाली पार्क केलेल्या दुचाकी आणि टेम्पोचं नुकसान झालं आहे. नुकतंच, मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १६ जणांना मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर अवघ्या होर्डिंगचा विषय समोर आला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातही अनधिकृत होर्डिंगचे ऑडिट करण्याचे काम सुरू आहे.