लोकसत्ता, प्रतिनिधी
पुणे: पुणे शहराचा मध्यवर्ती भाग आणि उपनगरात सकाळी पावसाने हजेरी लावली. शहर परिसरातील वातावरण ढगाळ झाले आहे.
सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शहराचा मध्यवर्ती भाग, स्वारगेट, सहकार नगर आणि सातारा रस्ता परिसरात हलका पाऊस झाला. पावसामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांची धावपळ उडाली.
आणखी वाचा- पुणे: नवीन मुठा कालव्याला पुन्हा गळती
दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये तापमानाच्या पाऱ्याने ४० अंश सेल्सिअसचा पारा ओलांडला होता. मात्र, आता बहुतांश ठिकाणी कमाल आणि किमान तापमानातही किंचित घट दिसून येत आहे. ही घट आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.