पुणे : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत देशाच्या बहुतांश भागात सरासरीच्या ११२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च, या तीन महिन्यांत देशात सरासरी ६९.७ मिमी पाऊस पडतो. यंदा सरासरीच्या ११२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही या काळात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, हिवाळ्यात डिसेंबरअखेर किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले आहे, पुढील काळातही तापमान जास्त राहण्याचा अंदाज आहे. जानेवारी महिन्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.

Mumbais air quality worsened from Diwali fireworks displays on first day itself
दिवाळीनंतरही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नाहीच!, सलग पाच दिवसांच्या घसरणीमुळे अशुद्ध हवा
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Constant changes in the states climate But wait for the winter
राज्यात थंडीची प्रतिक्षाच! पाऊस मात्र…
Maharashtra winter updates
Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
belgaon black day marathi news
सीमा भागात काळा दिन; बेळगावात फेरीला प्रतिसाद
Mumbai air quality remains in moderate category
दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच; कोणत्या भागातील हवा ‘अतिवाईट’?
how to make water diya at home
Diwali 2024 : तेल नव्हे, पाण्यावर जळतात हे दिवे? या दिवाळीला वापरा पाण्यावर जळणारे दिवे, जाणून घ्या हटके जुगाड
Increase in heat in next two days in Mumbai print news
मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेचे

हेही वाचा >>>पुण्यात संपाचा असाही परिणाम! आधी अफवा नंतर पेट्रोल पंपांवर रांगा अन् सगळे सुरळीत

एल-निनो मार्चपर्यंत सक्रिय

प्रशांत महासागरातील एल-निनोची स्थिती मार्चअखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण तापमानात वाढीचा कल कायम राहणार आहे. २०२३ मध्ये देशाचे तापमान सरासरीपेक्षा ०.६५ अशांनी जास्त नोंदविले गेले आहे. या अगोदर २०१६ मध्ये सरासरी तापमान ०.७१ अंशांनी जास्त नोंदविले गेले होते. सध्या सक्रिय असलेली हिंद महासागरीय द्विध्रुविता हळूहळू निष्क्रीय होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >>>चालकांचे आता चलो दिल्ली! ३ जानेवारीला जंतर मंतरवर आंदोलन

बिगरमोसमी पाऊस कमीच

मोसमी वारे माघारी गेल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात देशात सरासरी ११०.७ मिमी पाऊस पडला आहे, तो सरासरीच्या ९१ टक्के आहे. राज्यात बिगरमोसमी पाऊस ९६.४ टक्के झाला आहे. राज्यात सरासरी ५९.३ मिमी बिगर मोसमी पाऊस पडतो. फक्त डिसेंबर महिन्यात राज्यात सरासरी ६.१ मिमी पाऊस पडला आहे, जो डिसेंबर महिन्याच्या सरासरीच्या ३३ टक्के अधिक आहे. राज्यात सरासरी ४.६ मिमी पाऊस पडतो.