पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या वक्तृत्वकौशल्याने नेहमीच चर्चेत असतात. टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर ते देतातच, तसेच चांगल्या गोष्टींचे ते कौतुकही करतात. राज ठाकरे यांनी नेत्यांबाबत केलेल्या मिश्किल विधानांनी नागरिकांमध्ये चांगलाच हशा पिकतो. असाच काही प्रकार पुण्यात घडला. राज ठाकरे यांनी पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वास्तूला भेट दिली. यावेळी एक दुर्मिळ फर्मान पाहून राज ठाकरे यांनी अजित पवारांविषयी केलेल्या वक्तव्याने उपस्थित सर्वांनाच हसू आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – पुणे पोलिसांनी कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांच्या सायलेन्सरवर फिरवले बुलढोझर!

हेही वाचा – पुणे : बुधवार पेठेत वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून

वास्तूतील काही दुर्मिळ फर्मानाविषयी पांडुरंग बलकवडे राज ठाकरे यांना माहिती देत होते. त्या फर्मनामधील लिखाणाची पद्धत पाहून राज ठाकरे यांना अजित पवार यांची आठवण आली. फर्मानातील लिखाण हे अजित पवार बोलतात त्याप्रमाणेच असून स्वल्पविराम नाही, उद्गारवाचक चिन्ह नाही, असे मिश्किल विधान त्यांनी केले. राज ठाकरे यांनी असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. आता राज ठाकरे यांच्या मिश्किलपणे केलेल्या टिप्पणीला अजित पवार कशा प्रकारे उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत, पांडुरंग बलकवडे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.