महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महानगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सौंदर्यदृष्टीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पालिका, राज्य व केंद्र सरकारमध्ये आर्किटेक्टपेक्षा इंजिनियरला अधिक महत्त्व असतं, असं सांगत राज ठाकरेंनी शासकीय इमारतींवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहांचा दाखला देत केलेल्या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ते शनिवारी (२१ ऑक्टोबर) पुण्यात एका मुलाखतीत बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “सौंदर्यदृष्टी मुळात सत्तेत असावी लागते. जो राजा असतो, राज्यकर्ता असतो त्याला सौंदर्यदृष्टी असेल, तर ती खाली झिरपत जाते. खाली तुम्ही कितीही टाहो फोडा काही होत नाही. महापालिकेत, राज्य सरकारमध्ये विकास आराखडा होतो, पण शहर विकास आराखडा (टाऊन प्लॅनिंग) होत नाही. त्यामुळे ही शहरं अशीच बकाल होणार आहेत.”
“सरकारमध्ये इंजिनियरला महत्त्व, आर्किटेक्टला नाही”
“महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये जेवढं महत्त्व इंजिनियरला आहे तेवढं महत्त्व आर्किटेक्टला नाही. त्यामुळे तुमचे रस्ते, वास्तू कसे असणार हे इंजिनियर ठरवतो, आर्किटेक्ट ठरवत नाही,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.
“त्या बाथरूममध्ये मी पळत पळत अंघळ करू का?”
राज ठाकरे पुढे म्हणाले, “मी इतकी वर्षे महाराष्ट्रात फिरतो आहे. मी शासकीय विश्रामगृहे बघितली. त्यात प्रचंड मोठमोठी बाथरूम असतात. आता मी पळत पळत त्यात अंघोळ करू का? मात्र, मागचापुढचा विचार नाही, तिकडला सार्वजनिक बांधकाम खात्याचा इंजिनियर बघतो, ठरवतो आणि त्याच्या मनाप्रमाणे काम करतो.”
“तिथं नवविवाहित दाम्पत्य पकडा पकडी खेळणार का?”
“मी बीडमध्ये सिंचन विभागाच्या एका विश्रामगृहात गेलो होतो. मी बेडरूममध्ये गेलो, तर तो मोठ्ठा हॉल होता आणि त्याच्या मध्यभागी पलंग होता. आता तिथं जर एखादं नवविवाहित दाम्पत्य गेलं, तर ते तिथं पकडा पकडी खेळणार आहे का? मध्यभागी कुणी पलंग ठेवतं का?”, असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.
हेही वाचा : “मी एकच वाक्य सांगणार…”; मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड चर्चेनंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“सौंदर्यदृष्टी राज्यकर्त्यांमध्ये असावी लागते”
“आपल्याकडे असे विचार करणारे लोक आहेत. म्हणून ही सौंदर्यदृष्टी राज्यकर्त्यांमध्ये असावी लागते. जो राज्य करतो त्यांनी या गोष्टी बघाव्या लागतात,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.