लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मुंबईहून दोन तासांत अहमदाबाद येथे जाण्यासाठी बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे. मात्र, केवळ ढोकळा खाण्यासाठी एक लाख कोटी घालवायचे कशाला? भूगोल म्हणजे जमीन. भूगोल काबीज करण्यासाठी लढाया होतात. आपला भूगोल अडचणीत आहे. येथील जमीन चलाखीने विकत घेतली जात आहे. न्हावा-शिवडी रस्त्यामुळे रायगडमधील मराठी माणसाला फटका बसणार आहे, अशी टिप्पणीही राज ठाकरे यांनी केली.

Rahul Gandhi Post For Balasaheb Thackeray
Rahul Gandhi : बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींची पोस्ट; म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि आदित्य..”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
raj thackeray maharashtra vidhan sabha election 2024 (1)
Raj Thackeray: “निकालांनंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील”, राज ठाकरेंचं सूचक विधान; नेमकं राज्यात काय घडणार आहे?
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Uddhav Thackeray questioned cotton prices and whether farmers happy with current situation
शेतकरी सुखी आहे का ? उद्धव ठाकरे यांचा प्रश्न
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण

पिंपरी-चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णूदास भावे नाट्यनगरीतील शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनामध्ये ‘नाटक आणि मी’ या विषयावर राज यांची मुलाखत झाली. त्यावेळी राजकीय सद्यस्थिती, मध्यमवर्गीय मराठी माणूस आदी मुद्द्यांवर त्यांनी सूचक भाष्य केले. दीपक करंजीकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.

आणखी वाचा-“…तर मी शरद पवारांना वाकून नमस्कार करेन”; राज ठाकरे यांचं वक्तव्य चर्चेत

राज म्हणाले की, निवडणूक लढविण्याची लाज वाटते. स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये पहिली निवडणूक झाली. गेल्या ७० वर्षात पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण याच मुद्द्यांवर निवडणुका लढविल्या जात आहेत. याला प्रगती म्हणात येणार नाही. जातीपातीमध्ये लोकांना अडकविले जात आहे. हे लोण आता नाटक-चित्रपटातही येत आहे. जातीपातीमध्ये आपण एवढे गुंतलो आहोत की, आपली संस्कृती, परंपरा आणि आपल्या माध्यमांचा विसर पडला आहे.

चित्रपट हे माध्यम मला चांगले समजते. पण नाटकाबद्दल मला अधिक कुतूहल आहे. एका चौकानात हे कसे बसविले जाते, असा प्रश्न मला पडतो. नाटक हे त्या अर्थी सर्वांत अवघड माध्यम आहे, नाटकात रिटेक नसतो, असे सांगत कलावंतांबद्दलच्या माझ्या जाणिवा कायम जाग्या असतात. त्यामुळेच कलावंत कदाचित अडचणीत माझ्याकडे येत असतील. मला पाहूया, करूया, या गोष्टी आवडत नाहीत, असे राज ठाकरे यांनी सांगितले.