पुणे : व्यंगचित्र चितारण्यासाठी माझा हात दररोज शिवशिवतो खरा. पण, ती बैठक आणि शांतता मिळत नसल्याने व्यंगचित्र काढण्यासाठी वेळ होत नाही. माझी व्यंगचित्रे बऱ्याचदा भाषणातूनच बाहेर पडतात, अशी मार्मिक टिप्पणी व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी केली.

जागतिक व्यंगचित्र दिनाचे औचित्य साधून युवा संवाद सामाजिक संस्था आणि कार्टुनिस्ट कम्बाईन यांच्या वतीने आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित, युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय गरड, कार्टुनिस्ट कम्बाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री आणि सचिव योगेंद्र भगत या वेळी उपस्थित होते.

Raj Thackeray Election
Raj Thackeray : राज ठाकरे निवडणूक का लढवत नाहीत? बाळासाहेब ठाकरेंबरोबरचा ‘तो’ प्रसंग आठवत म्हणाले…
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray says Obstruction of projects so people will not support him
“उद्धव ठाकरेंकडून प्रकल्पांची अडवणूक, जनता त्यांना थारा देणार नाही…” देवेंद्र फडणवीसांची टीका
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”

हेही वाचा >>>पुणे: कारखान्यांकडून २४४ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती; साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा

रत्नागिरीच्या दौऱ्यावर जाण्यासाठी पुण्याला येणार होतो. चारुहास पंडित यांच्या निमंत्रणावरून इथे टोल भरायला आलो, अशी सुरुवात करून राज ठाकरे म्हणाले, व्यंगचित्र हा माझ्या आवडीचा विषय असल्याने इथे येणे स्वाभाविक होते. प्रभाकर झळके नाशिकहून येऊ शकतात तर मला इथे येणे भागच होते. कला आपल्याला जे दाखविते ते विलक्षण असते. खरं तर ही भाषण करण्याची वेळ नाही. मी केवळ शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. माझ्याकडून काय सहकार्य हवे ते कार्टुनिस्ट कम्बाईन संस्थेने अगदी हक्काने सांगावे.गरड यांनी प्रास्ताविक केले. पंडित आणि  मिस्त्री यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा >>>पुणे: शिरूर ते कर्जत नवा महामार्ग

तीन मिनिटांत व्यंगचित्र

कोऱ्या कॅनव्हावर रेषांच्या फटकाऱ्यांने अवध्या तीन मिनिटांमध्ये राज ठाकरे यांनी व्यंगचित्र साकारून आपल्या कलेवरची हुकूमत दाखविली. रसिकांच्या आग्रहाखातर त्यांनी अवघ्या तीन मिनिटांमध्ये अजित पवार यांचे अर्कचित्र साकारले. ‘खूप दिवसांनी कुंचला हाती धरला आहे. बाळासाहेबांप्रमाणे बैठक मारून चित्र काढण्याची सवय आहे. त्यामुळे जे व्यंगचित्र काढले आहे ते गोड मानून घ्या’, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.