Raj Thackeray : महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीय संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र आहे. राज्यातील नेत्यांनी यावर अनेकदा प्रतिक्रियासुद्धा दिली आहे. दरम्यान, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्रातील जातीय संघर्षावर टीप्पणी केली आहे. व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या एका व्यंगचित्राचा हवाला देत त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी पुण्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. तसेच आज त्यांनी व्यंगचित्रकार शि. द फडणीस यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याच्यानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभाग घेतला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील जातीय संघर्षावर मार्मिक भाष्य केलं.

Rahul Gandhi clarify his stance on reservation
नागपूर : राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा महाराष्ट्रात… बावनकुळेंचा इशारा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
rohit pawar on ajit pawar confession
Rohit Pawar : “ज्या पक्षाने कुटुंब फोडलं, त्यांना…”; अजित पवारांच्या ‘त्या’ कबुलीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया!
gunratna sadavarte sharad pawar news
“एसटी कर्मचाऱ्याच्या संपात शरद पवार, उद्धव ठाकरेंची माणसं”; गुणरत्न सदावर्तेंचा आरोप; म्हणाले, “ज्या कृती समितीने…”
readers feedback on loksatta editorial
लोकमानस: राष्ट्रपतींचे भाष्य लक्षणीयच, पण…
sharad pawar group
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्यावरून शरद पवार गटाचं भाजपावर टीकास्र; म्हणाले,“राम मंदिर अन् संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या…”
satara A minor girl commits suicide
अल्पवयीन मुलीची तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; साताऱ्यात तणाव, पोलीस अधीक्षकांचे कठोर कारवाईचे आदेश
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande : “संजय राऊतांचा बुद्ध्यांक कमी झालाय, त्यामुळे त्यांना…”; राज ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेला मनसेचं प्रत्युत्तर!

हेही वाचा – “थँक यू व्हेरी मच”, राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारताच प्रकाश आंबेडकरांची खोचक टिप्पणी; म्हणाले, “आम्ही त्याला…”!

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

शि. द फडणीस यांचे एक व्यंगचित्र आहे. या व्यंगचित्रात एक मांजर आहे आणि तिची पिल्लं दूध पित आहेत. त्यात एक उंदीरदेखील आहे. एक वात्सल्याचा तो भाव आहे. जर आज मी ते व्यंगचित्र करायला घेतलं, तर मी दाखवीन की मांजर तिथेच आहे. पिल्लं अंगावरच्या पट्य्यांमुळे भांडत आहेत. मी या जातीचा, तू कोणत्या जातीचा? बाकी सर्व उंदीर दूध पित आहेत आणि ती मांजर म्हणजे महाराष्ट्र आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाचे म्हणजे राज ठाकरे यांनी यापूर्वीसुद्धा व्यंगचित्रांच्या माध्यमांतून महाराष्ट्रातील जातीय संघर्षाबाबत भाष्य केलं आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचाराची पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबूक पेजवर एक व्यंगचित्र पोस्ट केलं होतं. या व्यंगचित्रात शिवाजी महाराज वेगवेगळ्या जातीच्या लोकांशी संवाद साधत असल्याचे दाखवण्यात आलं होतं. ‘अरे, तुम्हासर्वांना बरोबर घेऊन मी मुघलांशी लढलो! आणि आज तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढताय!का? तर त्या जातीयवादी स्वार्थी नेत्यांसाठी! या रे माझ्या लेकरांनो त्या चिखलातून बाहेर या!, असे छत्रपती शिवाजी महाराज दलित, मराठा व ब्राह्मण समाजातील पात्रांना उद्देशून बोलताना दाखवण्यात आले होते.

Raj Thackeray
सौजन्य – राज ठाकरे फेसबूक पेज

हेही वाचा – “दुर्दैवाने जनतेनं राज ठाकरेंसारखी भूमिका…”, शरद पवारांचा टोला; अजित पवारांनाही केलं लक्ष्य!

Raj Thackeray
सौजन्य – राज ठाकरे फेसबूक पेज

याशिवाय आणखी एक व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीयवादाबाबत भाष्य केलं होतं. या व्यंगचित्रात काही महिलांनी त्यांच्या राज्याच्या वेशभूषा परिधान केलेल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यावर तामिळ अस्मिता, बंगाली अस्मिता, पंजाबी अस्मिता, असे लिहिण्यात आलं होतं. मात्र, महाराष्ट्रातील महिलेच्या वेशभूषेवर दलित, ब्राह्मण, आगरी, माळी, असा विविध जातींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता.