पुणे : तब्बल सात दशकांनी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीत ७० वर्षांनी होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान सरहद संस्थेला मिळाला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात नियोजित या साहित्य संमेलनासाठी सरहद संस्थेच्या वतीने बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातून शंभरहून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला. त्यातून संमेलनासाठी वापरण्यात येणाऱ्या बोधचिन्हाची निवड मनसे राज ठाकरे करणार असून त्यांच्याच हस्ते बोधचिन्हाचे अनावरण करण्यात येणार आहे.

हेही वाचा – पुणे : घोरपडी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूक बदल

हेही वाचा – पुणे : खून प्रकरणात सात वर्षे गुंगारा देणारा गजाआड, गुन्हे शाखेची ठाण्यात कारवाई

यापूर्वी १९५४ मध्ये दिल्ली येथे मराठी साहित्य संमेलन झाले होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. मात्र, संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर प्रथमच देशाच्या राजधानीत प्रथमच मराठी सारस्वतांचा दरबार भरणार आहे.